त्र्यंबकेश्वर ताम्रपत्रधारी पंडित :
नाशिक मधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे महादेवाला समर्पित प्राचीन मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर हे धार्मिक स्थळ हिंदू धर्मातील नारायण नागबली, काल सर्प दोष, त्रिपिंडी श्राद्ध पूजा, कुंभ विवाह, रुद्राभिषेक पूजा, महाम्रीत्युन्जय मंत्र जाप इत्यादी पूजा करण्यासाठी फार प्रसिद्ध जागा आहे. नारायण नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध पूजा हि महत्वाची पूजा फक्त त्र्यंबकेश्वर येथेच केली जाते. त्र्यंबकेश्वर मध्ये पूजा करण्याचा जन्मसिद्ध अधिकार फक्त ताम्रपत्रधारी पंडित चाच आहे.
त्र्यंबकेश्वर देवस्थानाला ताम्रपत्रधारी पंडितांचा वारसा लाभला आहे. ताम्रपत्रधारी पंडित हे त्र्यंबकेश्वर चे अस्सल पंडित आहेत. पुरोहित संघ हि त्र्यंबकेश्वर मधील ताम्रपत्रधारी पंडितांची संस्था आहे. हजारो वर्षांपूर्वी श्रीमंत नानासाहेब पेशवा यांनी त्र्यंबकेश्वर चे रहिवासी असलेल्या आणि प्रत्येक पूजेचे उच्च ज्ञान असणाऱ्या सर्व पंडितांना ताम्रपत्रे बहाल केली होती. हि ताम्रपत्रे तांब्याचा धातू पासून बनलेली पत्रे होते. ताम्रपत्रे हे दर्शवते कि फक्त हेच पंडित त्र्यंबकेश्वर चे अस्सल ज्ञानी पंडित आहेत आणि यांनाच त्र्यंबकेश्वर मध्ये पूजा करण्याचा अधिकार आहे. तेव्हा पासून हि ताम्रपत्रे पिढ्यानु पिढ्या जपून ठेवण्यात आले आहेत. आणि आज त्र्यंबकेश्वर मध्ये हि ताम्रपत्रे ते पंडित त्र्यंबकेश्वर मधील लोकल पंडित असल्याचा पुरावा दर्शवतात.
त्र्यंबकेश्वर मध्ये सर्व ताम्रपत्रधारी पंडित हे पुरोहित म्हणून ओळखले जातात. पुरोहित संघ नावाची संस्था देखील त्यांचा साठी बनवण्यात अली आहे. पुरहोती संघ गेल्या १२०० वर्षांपासून त्र्यंबकेश्वर मध्ये येणाऱ्या भक्तांचा शंकांचे निराकरण करण्याचे काम करत आहे. ताम्रपत्रधारी पंडित तुम्हाला पूजेसाठी उत्तम मार्गदर्शन करतात. पूजे साठी योग्य मुहूर्त सांगणे, तुम्ह्लाला कोणता दोष आहे हे सांगणे, त्यावरील उपाय इत्यादी. त्र्यंबकेश्वर मधील काही पूजा या ३ किंवा २ दिवसांचा देखील असतात. ताम्रपत्रधारी पंडित त्या कालावधीत तुमहाला राहण्याची सोय, जेवणाची सोय या साठी देखील मदत करतात.
पुरोहित संघ हा ३०० ताम्रपत्रधारी पंडितांचा ग्रुप आहे. त्र्यंबकेश्वर मधील ताम्रपत्रधारी पंडितांकडे स्वतःचा एक रेजिस्ट्रेशन नंबर आहे. ताम्रपत्रधारी पंडितांचा ताम्रपत्रावर पुरोहित संघ या संस्थेचा ऑफिसिअल लोगो आहे.
त्र्यंबकेश्वर ताम्रपत्रधारी पंडितांनी अनेक वर्षांपासून त्र्यंबकेश्वर मधील पूजांची पारंपरिकता जपली आहे. या पंडितांना पूजा करताना वापरण्यात येणारे योग्य मंत्र उच्चार, मंत्रांचा अर्थ, पूजा विधीची यांची योग्य माहिती आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये नवीन असणाऱ्या भक्तांनी पूजा करताना पंडित ताम्रपत्रधारी आहे कि नाही याची योग्य खात्री करून घ्यावी. खोट्या पंडितांपासून पासून वाचावे.
त्र्यंबकेश्वर येथे पूजा करण्याचे महत्व :
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे भारतातील महादेवाचा पवित्र १२ जागृत ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे त्रिमूर्तीचे प्रतीक आहे जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना दर्शवते. त्र्यंबकेश्वर जवळून वाहणारी पवित्र गोदावरी नदी आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा आशीर्वादामुळे येथे केल्या जाणाऱ्या पूजा सफल होतात आणि लवकर फळ देणाऱ्या ठरतात. आणि ताम्रपत्रधारी पुरोहितांकडून केली जाणारी पूजा हि इतर कोणत्या हि पंडितांकडून केलेल्या पूजे पेक्षा लवकर फळ देणारी ठरते.
जर तुम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये पूजा करण्याचे नियोजन करत असाल तर पूजेला जाण्याआधी त्र्यंबकेश्वर चा ऑफिसिअल वेबसाईट वरून ताम्रपत्रधारी पंडितांशी संपर्क साधावा. ते तुम्हाला तुमची जन्म पत्रिका पाहून पूजेसाठीचा योग्य मुहूर्त, पूजा सामग्री, कोणते कपडे परिधान करावे, पूजेचे मूल्य या सर्व प्रश्नांचे समाधान करतील.
त्र्यंबकेश्वर मध्ये पूजा करणारा व्यक्तीला पूजेचा एक वेगळाच अध्यात्मिक अनुभव मिळतो. त्र्यंबकेश्वर मध्ये केली जाणारी रुद्राभिषेक पूजा हि मूळ ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी होत असल्याने तुम्हाला पूजेची बुकिंग आधीच करुनठेवणे आवश्यकत असते. https://www.trimbakeshwar.org/ या वेबसाइट वरून तुम्ही तुमची पूजा घरबसल्या बुक करू शकता.